
मागच्या लेखामध्ये आपण उपवासाचे फ़ायदे व प्रकार पाहिले. आज आपण पाहुया कि लंघन exactly कुठे आणि कश्या प्रकारे करावे ?

लंघन म्हणजे काय ?
यत् लाघवकरं देहम् तत् लंघनम् ...
ज्यामुळे शरीरास हलकेपणाची भावना निर्माण होते ते लंघन होय. लघु म्हणजे हलकं ..ओझे कमी झाल्याप्रमाणे वाटणे.
जेव्हा जेव्हा शरीरामध्ये जडपणा वाढतो तेव्हा लंघन हितकारक ठरते. जसे Obesity, (लठ्ठ पणा) Constipation, Indigestion, Hypothyroidism, Diabetes Mellitus, Asthma, High Cholesterol, ताप (Fever) etc , परंतु अशा परिस्थितमध्ये काही नियमांचे पालन आवश्यक असते.
लंघन विविध प्रकारे करत येते. (यथा बल)
एक वेळ अन्नसेवन राहून
दोन्ही वेळेस लघु आहार सेवन
दोन्ही वेळेस अन्न सेवन न करता only फलाहार करून
उदाहरण Diabetes Mellitus च्या रुग्णांमध्ये साखर कमी झाल्यावर सुद्धा भुकेची संवेदना होत असते. तेव्हा ती खोटी भूक आहे वा Sugar कमी झाल्या मुळे आहे, त्याचे योग्य ती पडताळणी
आपल्या वैद्यांकडून केल्या शिवाय लंघनाचा पर्याय निवडू नये.
तापामध्ये साहजिकच शरीराची जेवणाची इच्छा कमी होते...ते आपसूकच लंघनाची मागणी करतं त्या वेळेला खाल्ले नाही तर अशक्तपणा येईल अशी भीती बाळगू नये. लघु आहार घ्यावा अथवा लंघन करावे.
Obesity सारख्या आजारावर लंघन हितकारक होय. त्यांमध्ये Intermittent fasting व नियमित पणे लंघन केल्यास अधिक फायदा होतो.
Intermittent fasting याचा अर्थ normal पेक्षा काही काळ जास्त उपाशी राहणे. Preferably ते evening la करावे कारण संध्याकाळी 7 नंतर तसेही आपले पचन शक्ती कमी होत असते.म्हणून रात्री उपास करणे वा लघु आहार घेणे योग्य ठरते.
Asthma मध्ये पूर्ण लंघन जरी शक्य नसले तरी "न अति सौहित्यम् " या न्यायानुसार अति प्रमाणात जेवण घेऊ नये. जेणेकरून Abdominal pressure वाढून Asthma/ दमा चा वेग/ attack येईल. बहुतांशी रात्री च्या वेळेला लंघन वा लघु आहार घ्यावा.
Hypothyroidism मध्ये सुध्दा Obesity हे लक्षण दिसून येते. तेव्हा लंघन हे अपेक्षित होय. कफाच्या सर्व विकारांवर लंघन हितकारक होय.
Indigestion / अपचन मध्ये अन्नचा विपाक नियमित स्वरूपात नसल्याने लंघन करावे जेणेकरून जो आम (अपाचित अन्नरस) निर्माण झाला आहे त्यांचे लंघना द्वारे पचन होईल.
High Cholesterol असणे हे सुद्धा Diabetes व Obesity चे symptom आहे.
लंघन हितकारक आहार -
1. मुगाचे कढण
2. मुगाची खिचडी
3. वाटलेल्या मूग मसूर डाळीची आमटी
4. मूग डाळ वाटून केलेली धिरडे / पराठे
5. कुळीथ/हुलगा चे केलेले खिचडी, आमटी
6. पॉपकॉर्न /लाह्या
7. राजगिरा
8. नाचणी सत्त्व वा भाकर
9. ज्वारी भाकर
10. जे फळ घेऊन लंघन वा उपवास करू इच्छितात त्यांनी फळांचा रस घेण्यापेक्षा direct फळ खाण्याची सवय ठेवावी.
जेणे करून आहारात roughage जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क -
वैद्य मयूरी शिंगणापूरकर कावळे
MD, PhD Scholar ( AYU)
Tejomaya's AYUR-DENT CLINIC
Nagpur