

आपण अनेकदा उपवास करतो परंतु आयुर्वेद नुसार उपवास कसा करावा. हे आज बघुया.
आचार्य चरकांने उपवास हा लंघनाचा एक उपक्रम म्हणून उल्लेखिला आहे.
चतुष्प्रकारा संशुद्धिः पिपासा मारुतातपौ ।
पाचनान्युपवासश्च व्यायामश्चेति लङ्घनम् ।।
उपवास हा शब्दाची निरुक्ती उप + वास पासून होते.
उप चा अर्थ जवळ आणि वास म्हणजे राहणे. कुठल्या तरी व्यक्ती वा वस्तूच्या सानिध्यात राहणे म्हणजे उपवास होय. म्हणूनच आराध्य देवताची उपासना करताना उपवास करण्याची प्रथा प्रचलित आहे. मग ती वेगवेगळ्या पद्घतीने का असोनात...
उपवास म्हणजे आयुर्वेदानुसार दोष पाचनाची Process. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास शरीरातील toxins पचवण्याची Process. म्हणूनही बरेचदा ताप आल्यास आपण लंघन करतो...जेणेकरून आपल्या शरीरातील जे toxins आहेत ते कमी होतील.
उपवास कसा करावा या मध्ये बरीच मतमतांतरे आहेत. काही लोक त्याचा अतिरेक सुद्धा करताना दिसतात. तो करताना प्रकृती, ऋतू व दोषांचा विचार केला जातो. जसे वात व पित्त प्रकृती च्या व्यक्तींना अनशन (अजिबातअन्न सेवन न करणे) सहन होत नसल्याने त्यांनी अल्प म ात्रेत आहार सेवन करावे जे पचायला हलके असतील. तसेच शरद वा ग्रीष्म ऋतू मध्ये विना जल उपवास करणे योग्य नव्हे. त्याने Dehydaration होण्याची शक्यता असते. कफ प्रकृतीच्या व्यक्तींना उपवास सहन होत असल्याने व त्यांच्या शरीराला उपवासाची गरज असल्याने महिन्यातील दोन ते तीन दिवस उपवास करावा.
Fast वा उपास कसा, कुणी करावा ?
1.उपवास ही आयुर्वेदानुसार दोषपाचनाची प्रक्रिया जरी ग्राह्य धरली तरी तिच्या मुळे metabolism सुध्दा प्राकृत होते.
Metabolism अर्थात सूक्ष्म पचन. म्हणून Diabetes व Hypothyroidism च्या रुग्णांनी नियमितपणे उपवास करावा.
2. उपवास करताना एक वेळ भोजन करून एक वेळ फलाहार से वन करता येतो. वा दिवसभर केवळ फलाहार करता येतो.
उपवासाच्या दिवशी exercise व मानसिक तणाव कमी करावा.
३. रताळी, बटाटा, वरीचा तांदुळ सेवन करावयाचा असल्यास शिजवून घ्यावा. साबुदाणा खिचडी टाळावी. (पचायला जड)
४. उपवासाच्या आदल्या दिवशी खूप Oily व spicy पदार्थ टाळावे. जेणेकरून दुसऱ्या दिवशी अधिक तहान जाणवणार नाही .
५. फळांच्या रसाच्या सेवना एवजी फळांच्या फोडी खाव्यात.
६. उपवासाचे पदार्थ बनविताना तेल व मीठ कमी वापरावे.
उपवास हा लंघनापैकी एक उपक्रम असून लंघन बऱ्याच पद्धतीने करता येऊ शकते. अधिक माहिती पुढील भागा त.
वैद्य मयुरी शिंगणापूरकर कावळे
MD (AYU)
Tejomaya's AYUR-DENT CLINIC
Nagpur